New RBI Governor: रिझर्व्ह बँकेच्या ​सर्वोच्चपदी संजय मल्होत्रा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० डिसेंबर ।। महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची आरबीआयचे (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून मल्होत्रा आता आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील. शक्तिकांता दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपणार आहे. राजस्थान केडरचे १९९० बॅचचे आयएएस अधिकारी मल्होत्रा यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असून १९३५ मध्ये RBI स्थापन झाल्यानंतर एकूण २५ गव्हर्नरांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचा कार्यभार स्वीकारला आहे.


RBI गव्हर्नरांचा पगार किती, कोणत्या सुविधा मिळतात?
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या पगाराबद्दल बोलायचे तर नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांना अडीच लाख रुपये पगार मिळेल जो त्यांना मिळणाऱ्या एकूण पॅकेजचा भाग असेल. तसेच पगाराव्यतिरिक्त, RBI गव्हर्नरला भारत सरकारकडून मोफत निवास, वाहन, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शनसह इतर अनेक सुविधा दिल्या जातात. गेल्या आर्थिक वर्षात शक्तीकांता दास यांचे मासिक वेतन अडीच लाख रुपये होते तर, शक्तीकांत दास यांच्या आधी आरबीआय गव्हर्नर राहिलेल्या उर्जित पटेल यांचा मासिक पगारही सारखाच होता. विशेष म्हणजे RBI गव्हर्नरचा पगार सरकारी सचिवाच्या पगाराएवढा आहे.

मलबार हिलमध्ये आलिशान घर
दरम्यान, RBI गव्हर्नर या नात्याने सर्वात मोठा फायदा घराचा आहे. मुंबईतील मलबार हिल येथे खूप मोठे घर आरबीआय गव्हर्नरांना दिले जाते. फिगरिंग आउट पॉडकास्टमध्ये यूट्यूबर राज शामानी यांच्याशी संवाद साधताना माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले होते की मी एकदा एक गणना केली होती. आम्ही आमचे घर विकले असते तर आम्हाला ४५० कोटी रुपये मिळाले असते. आरबीआय गव्हर्नरची नियुक्ती रिझर्व्ह बँक कायद्यानुसार केंद्र सरकार करते. RBI गव्हर्नरची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीद्वारे (ACC) केली जाते ज्याचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात.

RBI गव्हर्नर की SBI प्रमुख, कोणाचा पगार जास्त?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील बँकिंग नियामक असून देशासाठी आर्थिक धोरण बनविण्यासोबतच अनेक महत्त्वाचे धोरणविषयक निर्णय घेतात. मात्र, RBI गव्हर्नरांचा पगार देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) प्रमुखांपेक्षा कमीच आहे. अलीकडे, २८ ऑगस्ट २०२४ रोजी चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची SBI चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार सीएस शेट्टीचा वार्षिक पगार ३९.३ लाख रुपये आहे. त्याचवेळी, माजी SBI अध्यक्ष दिनेश खारा यांना २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३७ लाख रुपये पगार मिळाला होता. पगाराव्यतिरिक्त एसबीआय अध्यक्षांना मुंबईतील मलबार हिल्समध्ये राहण्यासाठी एक आलिशान बंगला मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *