अपघातांमुळे तोंड लपवावे लागते…; नितीन गडकरी यांनी व्यक्त केली खंत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ डिसेंबर ।। वाहतुकीच्या नियमांचे योग्यरीत्या पालन होत नसल्याने व बेशिस्तपणामुळे देशात सर्वाधिक अपघात होत असल्याचा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला. नियमांचे पालन न झाल्यामुळे मुंबईसारख्या शहरात माझ्या स्वत:च्या कारचा दोन वेळा दंड भरावा लागल्याचे लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना गडकरींनी स्पष्ट केले.

जगभरात लोक वेगाने वाहन चालवतात ही समस्या नाही. मात्र, भारतात लेन शिस्तभंगामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. लोकांना, विशेषत: तरुणांना वाहतूक शिस्तीच्या नियमाबद्दल प्रबोधनाची तर लहान मुलांना नियमांचे महत्त्व पटवून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. लोकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, यासाठी रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे गडकरी म्हणाले.

अपघात मालिका कमी होण्याऐवजी वाढत आहे
nदेशातील रस्ते अपघाताचा विक्रम एवढा वाईट आहे की जागतिक परिषदेत तोंड लपवावे लागते.
nरस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. मात्र, अपघाताची मालिका कमी होण्याऐवजी वाढत आहे, असे गडकरी म्हणाले.

४७४ लाेकांचा रस्ते अपघातात दरराेज भारतात मृत्यू हाेताे.
१.७ लाख लाेकांचा २०२३ मध्ये मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *