‘या’ ठिकाणी कराव्या लागणार दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका जमा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गुरुवारी (दि.18 एप्रिल) संकलन केंद्रावर जमा कराव्यात अन्यथा संबंधित नियामकास स्वखर्चाने विभागीय मंडळाच्या कार्यालयात उत्तरपत्रिका जमा कराव्या लागतील, असे स्पष्ट निर्देश विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी राज्य मंडळाशी संलग्न शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना दिले आहेत.

राज्य मंडळाकडून नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च आणि बारावीची परीक्षा 21 फेब—ुवारी ते 19 मार्चदरम्यान घेण्यात आली. दहावी-बारावीची परीक्षा सुरू असतानाच संबंधित विषयाची परीक्षा संपली की पेपर तपासणीचे काम सुरू होते. पेपर तपासणी झाल्यानंतर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका संकलन केंद्रावर जमा केल्या जातात. परंतु यंदा पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील नियुक्त नियामकांनी काही अपरिहार्य कारणांमुळे निर्धारित दिनांकास उत्तरपत्रिका जमा केलेल्या नाहीत.

उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी अडचणी आलेले नियामक व त्यांचे प्रमुख नियामक यांच्या अडचणी विचारात घेऊन संबंधितांना उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी गुरुवारची (दि. 18 एप्रिल) मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र संबंधित नियामकास स्वखर्चाने विभागीय मंडळाच्या कार्यालयात उत्तरपत्रिका जमा कराव्या लागतील, असा स्पष्ट इशारा उकिरडे यांनी दिला आहे.

संपूर्ण सोलापूर जिल्हा

1. श्रीछत्रपती शिवाजी माध्य. विद्यालय, प्रभात टॉकीजसमोर, सोलापूर (सकाळी 11 ते 1)
2. जनता विद्यालय, टेंभुर्णी, जि. सोलापूर (2.30 ते 4.30)
3. श्रीनारायणदास रामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, इंदापूर, जि. पुणे (5 ते 5.30)

संपूर्ण अहमदनगर जिल्हा

1. के. जे. सोमय्या हायस्कूल, श्रीरामपूर, जि. अहमदनगर
(सकाळी 11 ते 1)
2. ए. इ. सो.चे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अहमदनगर
(2.30 ते 4.30)

संपूर्ण पुणे जिल्हा

मंडळ कार्यालय, शिवाजीनगर, पुणे 05. (कार्यालयीन वेळेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *