उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेकडून ‘या’ विशेष गाड्यांची सुविधा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। चिमुकल्यांच्या परीक्षा उन्हाळ्याच्या सुट्या सुरू आहेत. तसेच, लोकसभा निवडणूक मतदानासाठी आपापल्या गावी जाणार्‍या प्रवाशांच्या गर्दीने रेल्वेचे पुणे स्थानक गर्दीने फुल्ल झाल्याचे चित्र बुधवारी (दि.17) पाहायला मिळाले. प्रवासी पुण्यातून कोकण भागासह, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, दक्षिण भारतासह देशभरात आपापल्या गावी जायला निघालेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर रेल्वेकडून अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांचे देखील नियोजन करण्यात आले आहे.


एसटी स्थानकांवर पाय ठेवायलाही जागा नाही
शहरातील प्रमुख एसटी स्थानकांवरसुद्धा गर्दी होत आहे. स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) स्थानकांवर आणि पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारामधूनसुद्धा अनेक चाकरमानी उन्हाळी सुट्यांसाठी आपापल्या गावी निघाले होते. यामुळे एसटी स्थानकावर पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *