महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ डिसेंबर ।। आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत 38 उमेदवारांची नावे आहेत. यात आप अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्याही नावाचा समावेश आहे. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीतून तर आतिशी या कालकाजीतून निवडणूक लढवणार आहेत.
याआधी पक्षाने 3 याद्या जाहीर केल्या आहेत. यावेळी पक्षाने कोणत्याही पक्षासोबत युती न करण्याचा निर्णय घेतला. पक्ष एकट्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून सर्व 70 विधानसभा जागांवर उमेदवार उभे करत आहे.
2 दिवसांपूर्वी तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती
आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 13 डिसेंबर 2025 रोजी तिसरी यादी जाहीर केली होती. यामध्ये नजफगड विधानसभा मतदारसंघातून तरुण यादव हे फक्त एका उमेदवाराचे नाव होते.
https://x.com/ANI/status/1868204164125487591?t=7pI1mTpsuCGXnIIn75BhrA&s=19