Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता १४ जूनपर्यंत करा ‘हे’ काम; अन्यथा……..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ डिसेंबर ।। आधार कार्डसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख आता पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. यावेळी ही तारीख ६ महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. म्हणजे लोक आणखी सहा महिन्यांपर्यंत आधार कार्ड अद्ययावत करू शकतात. युनिक आयडेंटिफेकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने आधार कार्डावरील तपशील मोफत अद्ययावत करण्याची तारीख वाढवली आहे. या संदर्भात यूआयडीएआयने ट्विट करून माहिती दिली आहे.

युनिक आयडेंटिफेकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने सांगितले की, आधार मोफत अद्ययावत करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे, जी पूर्वी १४ डिसेंबर २०२४ पर्यंत होती. आधार मोफत अद्ययावत करण्यासाठी तुम्ही myAadhaar पोर्टलची मदत घेऊ शकता. जर तुम्ही १४ जून २०२५ पूर्वी आधार अद्ययावत केले नाही, तर तुम्हाला या दिवसापासून शुल्क भरावे लागेल.

ऑफलाइन अपडेट्ससाठी भरावे लागेल शुल्क
UIDAI ने म्हटले आहे की, आधार केंद्रांवर ऑफलाइन अपडेट्ससाठी शुल्क भरावे लागेल. कृपया लक्षात घ्या की, ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर दिली जात आहे. UIDAI लोकांना कागदपत्रे अद्ययावत ठेवण्यासाठी माहिती पुरवीत आहे.

आधार कार्ड अपडेट कसे करायचे? (How to update Aadhaar card details Free 2024 process)
१. प्रथम UIDAI वेबसाइटला भेट द्या: myaadhaar.uidai.gov.in
२. तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि नंतर तुमच्या फोनवरील OTP सह व्हेरिफाय करा.
३. स्क्रीनवर दिसणारी माहिती तपासा, जसे की नाव आणि पत्ता. काही चुकीचे असल्यास ते बदला.
४. नंतर माहिती बरोबर असल्याच्या ओळखपत्राचा पुरावा द्या. यासाठी तुम्हाला एक अधिकृत ओळखपत्र द्यावे लागेल, जे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावे लागेल (2MB पेक्षा कमी आकाराचा).
५. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल, ज्याचा वापर करून तुम्ही अपडेटची स्थिती तपासू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *