महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ डिसेंबर ।। महायुती सरकारचा नागपुरात मोठ्या दिमाखात शपथविधी होत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गज नेतेमंडळींनी हजेरी लावली आहे. महायुती सरकारच्या ३९ मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. महायुती सरकारच्या शपथविधी होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातील ४ नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागली.
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळा नागपुरातील राजभवनात पार पडला जात आहे. या सोहळ्यात ३३ जणांची कॅबिनेटपदी वर्णी लागली. तर ६ जणांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. या मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्यातील ४ नेत्यांची वर्णी लागली आहे. यामध्ये अजित पवार, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आणि दत्ता भरणे यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. या नेत्यांची वर्णी लागल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.
