Google Lay Off: गुगलचा १० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ डिसेंबर ।। गुगल ही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. गुगलने कंपनीतील १० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. गुगलच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. सुंदर पिचाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Google Lay Off)

गुगलने १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. मॅनेजर, डायरेक्ट, अध्यक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे.

गुगलने बुधवारी याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने मागील वर्षी १२००० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. मागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. हा पुनर्रचना धोरणाचा भाग असल्याचे म्हटले आहे. (Google Lay Off for 10 Percent Employees)

याबाबत गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे की, काही जॉब रोल हे इंडिविज्युअल योगदानाच्या रोलमध्ये बदल करण्यात आले आहेत. तर काही जागा बंद करण्यात आल्या आहेत.

कंपनीने खर्चात कपात करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सुंदर पिचाई यांनी सांगितले की, गुगल कंपनीला २० टक्क्यांनी अधिक कार्यक्षम बनवण्याची इच्छा आहे. यानंतर २०२३ मध्ये १२००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले.

एका वृत्तानुसार, २०२४ मध्ये आतापर्यंत ५३९ टेक कंपन्यांनी १५००३४ कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे.२०२३ मध्ये १,१९३ कंपन्यांनी २,६४,२२० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *