महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ डिसेंबर ।। गेल्या आठवड्यात राजस्थानच्या जैसलमेर येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५५व्या बैठकीत पॉपकॉर्नवरील कर लावण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. जीएसटी परिषदेने चवीनुसार पॉपकॉर्नचा GST च्या वेगवेगळ्या स्लॅबमध्ये समावेश केला आहे. म्हणजे आता पॉपकॉर्न विकत घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. पॉपकॉर्नच्या प्रत्येक फ्लेवरवर किती कर आकारला जाईल सविस्तर जाणून घेऊ या…
पॉपकॉर्नवर आता लागू होणार 3 प्रकारचे टॅक्स
जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर आता पॉपकॉर्नवर आता तीन प्रकारे कर आकारला जाईल. पहिला म्हणजे पॉपकॉर्न मीठ आणि मसाले घालून खाण्यासाठी तयार आणि पॅक केले असेल पण त्यावर कोणतेही लेबल नसेल तर अशा पॅक केलेल्या पॉपकॉर्नवर ५% जीएसटी लागू होईल. त्याचबरोबर पॉपकॉर्नच्या पॅकेटवर लेबल असेल तर त्यावरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत वाढेल. तसेच तुम्ही कॅरमेलाइज्ड पॉपकॉर्न (साखर घालून तयार केलेले पॉपकॉर्न) खरेदी करत असाल तर तुम्हाला त्यासाठी १८ टक्के जीएसटी भरावा लागेल. कारण मग ते साखरेच्या मिठाईसारखे बनते.
मात्र, पॉपकॉर्नच्या किमतींबाबत कौन्सिलकडून एक परिपत्रक जारी करण्यात येणार असून त्यात पॉपकॉर्नवर कर आकारण्याची पद्धत काय असेल, हे स्पष्ट होणार आहे. यासोबतच, GST परिषदेने आधीच पॅक केलेल्या आणि लेबल केलेल्या वस्तूंच्या व्याख्येत सुधारणा करण्याची शिफारस केली असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले की जीएसटी कौन्सिलने फोर्टिफाइड तांदळावरील कराचा दर पाच टक्क्यांवर आणला आहे.
पॉपकॉर्नवरील GST कन्फ्युजन दूर करा
दरम्यान, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीतील निर्णयामुळे तुमचा गोंधळ उडाला असेल तर लक्षात घ्या की याआधीही पॉपकॉर्नवर टीकाच कर आकारला जायचा, तर आता केवळ परिषदेने आपले मुद्दे स्पष्ट केले आहेत. तुम्ही चित्रपटगृहात जे पॉपकॉर्न खातो त्यावर फक्त ५ टक्के कर लागतो कारण ते ओपन पॅकेटमध्ये असते आणि त्यावर कोणतेही ब्रँड नाव नसते. त्याचवेळी, पॅकबंद आणि लेबल केलेल्या पॉपकॉर्न पॅकेटवर यापूर्वी केवळ १२% कर आकारला जायचा आणि आता तितकाच कर आकारला जाणार आहे. त्याचप्रमाणे, याआधी देखील कॅरामलाइज्ड पॉपकॉर्नवर केवळ १८% जीएसटी होता, जो कायम ठेवण्यात आला आहे.
जीएसटीमुळे पॉपकॉर्न किती महागणार
वेगवेगळ्या प्रकारच्या पॉपकॉर्न वर तीन प्रकारे जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आता साहजिकच पॉपकॉर्नच्या किमतीत वाढ होणार आहे. पॉपकॉर्नवर जीएसटी दरवाढीनंतर आता तुम्ही शंभर रूपांचे कॅरॅमल पॉपकॉन खरेदी केलं इतर तुम्हाला किमान ११८ रुपये मोजावे लागतील.
पॉपकॉर्नच्या प्रकारानुसार तुम्ही मीठ आणि मसाला असलेले विना लेबलचे शंभर रुपयाचे पॉपकॉर्न घेतले तर त्यावर तुम्हाला पाच टक्के जीएसटी भरावा लागेल म्हणजेच तुम्हाला आता शंभर रुपयासाठी १०५ रुपये द्यावे लागतील. मात्र, हेच पॉपकॉर्न तुम्ही लेबलसह खरेदी केले तर तुम्हाला त्यावर १२% जीएसटी आकारला जाईल व हेच पॉपकॉर्न तुम्हाला शंभर ऐवजी ११ रुपयांना मिळतील.