महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ डिसेंबर ।। ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा मुहूर्त साधत भाविकांनी देव दर्शनासाठी गर्दी केलेली दिसत आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजूरी गडावर भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे. जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी आज भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. नाताळाच्या सुट्टी असल्याने भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. आत्तापर्यंत लाखो भाविकांनी खंडोबाचं दर्शन घेतलं आहे. त्यामुळे जेजुरीत भंडारा आणि खोबरं विक्रीत कोट्यावधींची उलाढाल झालेली बघायला मिळत आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि त्याला लागून आलेलं नवीन वर्ष यामुळे नागरिक मोठ्याप्रमाणात पर्यटन स्थळ तसंच धार्मिक स्थळांना भेटी देत आहेत. राज्यातल्या सगळ्या धार्मिक स्थळांवर यामुळे गर्दी बघायला मिळत आहे. जेजुरीमध्ये देखील मोठ्या संख्येने भाविकभक्त खंडोबाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत.