महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२९ डिसेंबर ।। नव्या वर्षाच्या स्वगाताल आणि २०२४ वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले आहेत. रायगडकडे मुंबई आणि पुण्यातील नागरिकांचा ओढा असल्याचे दिसतेय. वर्षाचा शेवट करण्यासाठी रायगडचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुल्ल झाले आहेत. कुटुंब आणि मित्रांसोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. हॉटेल, समुद्र किनारे हाऊसफुल्ल भरले आहेत. समुद्रांच्या लाटांचा आनंद घेतला जातोय. काहीजण वॉटरस्पोर्ट्समध्ये आनंद घेत आहेत. एकूणच काय तर विकेंडला नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यातच वर्षाचा शेवट आणि नवीन वर्ष येत अल्यामुळे गर्दी आणखी वाढली आहे.
2024 हे वर्ष सरत आले असून विकएन्डच्या निमित्ताने रायगडचे समुद्र किनारे फुल्ल झाले आहेत. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातुन पर्यटक रायगडमध्ये दाखल होत असून अलिबाग, मुरुड, दिवेआगार, श्रीवर्धनसह सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पहयला मिळत आहे. समुद्र किनाऱ्यांवर लाटांमध्ये डुबने, वॉटर स्पोर्टचा आनंद पर्यटक घेताना पर्यटक दिसत आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणात दाखल झालेत..त्यामुळे इथले हाँटेल्स ,बीच फुल झाले आहेत..समुद्रकिनारी मनमुराद आनंद सध्या पर्यटक लुटताहेत.गणपतीपुळे समुद्रकीनारी असणा-या बोटींगचा आनंद देखील पर्यटक लुटताहेत..इथं विविध प्रकारच्या राईड्स तुम्ही घेऊ शकता..अनुभवी आणि प्रशिक्षीत असणा-या बोट चालकांकडून इथल्या राईड्स तुम्हाला अनुभवता येतात..पर्यटकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी इथं घेतली जाते