महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३० डिसेंबर ।। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. यानंतर अनेक आरोप केले गेले. या हत्येतील तीन आरोपी हे अजूनही फरार आहेत. हे प्रकरण आता थेट सीआयडीकडे गेले असून सीआयडीकडून तपास केला जातोय. याप्रकरणी आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चाैकशी सीआयडीकडून करण्यात आलीये. सीआयडीचे मोठे अधिकारी बीडमध्ये आहेत. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावरही गंभीर आरोप केले जात आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जातंय.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, ते फरार आहेत. आज वाल्मिक कराड हे शरणागती घेणार असल्याची एक चर्चा आहे. वाल्मिक कराड यांचे बॅंक खाते गोठवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता वाल्मिक कराड हे शरण येणार असल्याची चर्चा आहे. खरोखरच वाल्मिक कराड हे शरण येणार का हे पाहण्यासारखे ठरेल.
वाल्मिक कराड यांच्या पत्नीचे सीआयडीकडून चाैकशी करण्यात आलीये. तब्बल दोन तास ही चाैकशी सुरू होती. दहा वर्षांपासून वाल्मिक कराड हे एनसीपीचे काम करतात. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळीमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात ते अग्रेसर असतात. परळीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. 307 सारख्या गुन्हांमध्ये सहभागी असल्याचा वाल्मिक कराड यांच्यावर आरोप आहे.