महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३१ डिसेंबर ।। कोल्हापूर-पुणे मार्गावर धावणार्या स्पेशलला (सह्याद्री एक्स्प्रेस) 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना कालावधीत बंद केलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस 5 नोव्हेंबर 2023 पासून कोल्हापूर ते पुणे या मार्गावर स्पेशल ट्रेन म्हणून सोडण्यात आली आहे.
या एक्स्प्रेसला स्पेशल ट्रेनचा दर्जा देण्यात आल्याने ही गाडी 31 डिसेंबर 2023 पर्यंत धावणार होती, त्यानंतर या गाडीला दर तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जात आहे. यावर्षीही ऑक्टोबरमध्ये दिलेली मुदतवाढ दि. 31 डिसेंबरअखेर होती, त्याला आता दि. 1 जानेवारी ते दि. 31 मार्च अशी मुदतवाढ दिली आहे. मुंबई येथील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर ही गाडी कोल्हापूर ते मुंबई अशी पूर्ववत सह्याद्री एक्स्प्रेस म्हणून धावेल.