महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ जानेवारी।। गेल्या काही दिवसांपासून वाढलेले भाज्यांचे भाव अचानक घसरले आहे. पण आता थंडीमुळे भाजीपाल्याची आवक वाढली आहे त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे. नवी मुंबईतील एपीएमपी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. एपीएमसीमध्ये तब्बल ६५० भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक होत आहे.
भाजीपाल्याचा पुरवठा जास्त मात्र मालाला उठाव नसल्याने हे दर घसरले आहेत. फ्लॉवर, कोबी, भोपळा, टोमॅटो आणि वांग्याचे दर 5 ते 10 रुपये प्रतिकिलो झाला आहे. तर पालेभाजी देखील 5 ते 10 रुपये प्रति जुडी मिळत आहे. भाज्यांचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण शेतकरी चिंतेत आले आहेत.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती. भाज्यांचे दर कडाडल्यामुळे सर्वसामान्यां जास्त पैसे मोजावे लागत होते. पण आता थंडी वाढल्यामुळे भाजीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. भाज्यांचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
घसरलेल्या भाजीपाल्याचे दर प्रतिकिलो –
फ्लॉवर- 6 रुपये
कोबी – 8 रुपये
भोपळा – 10 रुपये
टोमॅटो – 10 रुपये
वांगी – 10 रुपये
दुधी – 13 रुपये
पडवळ – 16 रुपये
घेवडा – 18 रुपये
पालेभाज्यांचे दर प्रति जुडी –
कांदापात – 7 ते 8 रुपये
कोथिंबीर – 6 ते 8 रुपये
मेथी – 6 ते 8 रुपये
पालक – 5 रुपये
पुदिना – 6 रुपये
शेपू- 8 ते 10 रुपये