संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ‘आका’ कोण? … धक्कादायक नाव समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.४ जानेवारी।। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात घडामोडींना वेग आला आहे. तीन फरार आरोपींपैकी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी आज पुण्यातून अटक केली. तर सिद्धार्थ सोनावणे याआधी अटकेत असलेला आरोपी अशा तिघांना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सातत्यानं ‘आका’चा उल्लेख केला आहे. यावरुन धसांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला आहे. आता हा आका नेमका कोण? याबद्दल आरोपीच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. ‘आका- आका म्हटलं जातंय तो आका म्हणजे विष्णू चाटे हाच आहे, तो आधीपासूनच कोठडीत आहे,’

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तर त्यांना मदत कणाऱ्या एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली. केज न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, हे लोक संघटित गुन्हेगारी करतात. टोळीने गुन्हे करतात, उद्योगधंद्यांना त्रास द्यायचही काम करतात, यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे येत नाहीत. तसेच पोलिसांकडून १५ दिवसांच्या रिमांडची मागणी करण्यात आली. सरकारी वकिलांनी म्हटले की, हे आरोपी सिंडिकेट चालवतात, ते एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे मकोकाअंतर्गत कारवाई व्हावी असी मागणी करण्यात आली.

तर आरोपींच्या वकिलांकडून याला विरोध करण्यात आला. आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप झाला नसल्याचे पोलिसांनी कोर्टात म्हटले. तर दुसरीकडे आरोपींना हत्येचा पश्चताप नाही, असे म्हणता येणार नाही, असे आरोपीच्या वकीलांनी म्हटले आहे. आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असलेलेले मुद्दे पुरेसे नाही, असा युक्तिवाद आरोपी पक्षाकडून करण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून आका म्हणवला जाणारा विष्णू चाटे यालाही आधीपासूनच अटक करण्यात आली आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *