MS Dhoni Fitness Secret : “मी पूर्वीसारखा …… ” महेंद्रसिंह धोनीने दिली कबुली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जानेवारी।। MS Dhoni Fitness Secret : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून धोनीने जरी सन्यास घेतला असला तरी चाहत्यांना त्याच्याबाबतीत नवनवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडते. तुम्हाला महेंद्रसिंग धोनीचे फिटनेस रहस्य माहितीये का? महेंद्रसिंग धोनीला त्याच्या दिनचर्येबद्दल विचारले असता, तो म्हणाला. “वयानुसार तंदुरुस्त राहण्यासाठी मी खूप खेळ खेळतो.”

युरोग्रिप टायर्स या युट्युब चॅनेलवर संवाद साधताना धोनी म्हणाला, “मी पूर्वीसारखा तंदुरुस्त नाही. आपण काय आहार घेतो, यावर खूप मेहनत घ्यावी लागते. मला तंदुरुस्त राहण्यासाठी विशिष्ट गोष्टी कराव्या लागतात. मी वेगवान गोलंदाज नाही त्यामुळे आम्हाला तितकं फिट राहण्याची आवश्यकता भासत नाही पण योग्य आहार घेणे आणि जिममध्ये वर्कआउट करणे याशिवाय विविध खेळ खेळणे, मला आरोग्यदायी फायदा मिळवण्यास मदत करतात.

धोनी पुढे सांगतो, “जेव्हा तुमची शारीरिक स्थिती चांगली असते, तेव्हा तुम्ही टेनिस, बॅडमिंटन किंवा फुटबॉलसारखे वेगवेगळे खेळ खेळू शकता. हे खेळ मला मग्न ठेवतात. तंदुरुस्त राहण्यासाठी हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. कारण हे खेळ खेळताना कंटाळा येत नाही. तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर खेळ खेळत असाल त्या व्यक्तीबरोबर तुम्ही धमाल करू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळते. तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल किंवा तुम्हाला खेळ जिंकायचा असेल तर विविध खेळ खेळा”

विविध खेळ खेळण्याचे फायदे जाणून घ्या
फिटनेस ट्रेनर वरुण रतन यांच्या मते, वेगवेगळे खेळ खेळल्याने शरीरातील विविध स्नायूंवर आणि सांध्यांवर ताण येतो ज्यामुळे वारंवार होणाऱ्या दुखापतीची शक्यता कमी होते.

ते पुढे सांगतात, “अमेरिकन जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, दरवर्षी आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ एका खेळात घालवल्याने नितंब किंवा गुडघ्याच्या दुखापतीचा धोका जवळपास तिप्पट होतो.”

“कारण एकच खेळ वारंवार खेळल्यामुळे अनेकदा शरीराच्या विशिष्ट भागांवर जास्त झीज दिसून येते पण ऋतूनुसार वेगवेगळे खेळ खेळल्याने शरीराच्या विशिष्ट अवयवांना विश्रांतीसाठी वेळ मिळतो आणि मानसिक तणावाचा देखील धोका कमी होतो.” डॉ. रतन पुढे सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *