Unseasonal Rain : राज्यात या ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा ; हवामानात मोठा बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जानेवारी ।। राज्यात एकीकडे गारठा वाढू लागला असताना हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस पावसाची (Rain Alert)शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि मध्य-उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना गारठ्यासह हलक्या पावसाच्या (IMD Forecast) सरीही कोसळणार आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि कमान तापमानात चढउतार होत होता, मागील दोन दिवसांपासून राज्यात थंडीला सुरूवात झाली होती. पण आता पुढील दोन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळीचा इशारा देण्यात आलाय. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. दोन दिवसानंतर राज्यात पुन्हा एकदा थंडी परतेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

थंडी पुन्हा वाढणार?
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा वेग धरला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून नाहीशी झालेली थंडी पुन्हा परतण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठा वाढणार आहे. मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधील किमान तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान ११ अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. राज्यात पुढील दोन दिवस थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये किती तापमान?
पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमनान १ ते ३ अंशाच्या खाली जाऊ शकते. मध्य राज्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान १० अंशाच्या खाली जात असल्याची नोंद झाली आहे. यवतमाळचे तापमान ७.६ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तर सोलापूर, सांगली, पुणे गोंदिया आणि नगर याठिकाणचे तापमान ८ अंशावर पोहचले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये १० ते १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *