Ajit Pawar : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जानेवारी ।। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण गेल्या दिवसांपासून तापलाय. संतोष देशमुख यांना न्याय मिळवा यासाठी अनेक राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी हा विषय लावून धरलाय. आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणी हत्या प्रकरणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनाम्या द्यावा अशी मागणी लावून धरलंय. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल मोठं वक्तव्य केलाय.

‘पक्ष वगैरे न बघता…’
अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा पत्रकरांनी त्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का, असा प्रश्न विचारल्यावर त्यावर अजित पवार यांनी थेट भाष्य केलं. ते म्हणाले की, आज न्यायलयाची चौकशी सुरु असून आता या तीन एजन्सी चौकशी करतात. जो कोणी दोषी असेल. ते सिद्ध झालं तर कारवाई करेन. चौकशी सुरु आहे. आरोपी सापडायला वेळ लागला. महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे, असे अजित पवार म्हणाले.

‘बडी मुन्नी कोण ते त्यांना विचारा’
पुढे अजित पवार म्हणाले की, कोण कुणाशी, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे याचा विचार केला जाणार नाही. मुख्यमंत्री देखील तसं म्हणाले आहेत. जो दोषी असेल त्यांना पाठीशी घालणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करु. तर सुरेश धस यांनी अजित पवार इशारा दिलाय. ते म्हणाले, सुरेश धस यांनी पुरावे द्यावेत, आरोप करताना त्यांनी विचार करावा. आम्ही या प्रकरणात राजकारण आणणार नाही. कुणाला पाठीशी घालणार नाही. तर बडी मुन्नी कोण ते त्यांना विचारा, असंही अजित पवारही म्हणाले. या चौकशीदरम्यान जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते सिद्ध झाले तर त्यांच्यावर ताबडतोब चौकशी होईल. या संदर्भात मी देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. यात कोणताही पक्ष वैगरे न बघता, जर कोणी वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती यात दोषी असतील, तर कोणाचीही गय करण्याचे कारण नाही, असेही मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यांनी मी त्या देखील प्रकारचा आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे चौकशी सुरु आहे.

पालकमंत्री कुणाला करायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. माझा पक्ष त्यांचा पक्ष वेगळा त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील. त्यांच्या खासदरांशी कोणीही संपर्क साधलेला नाही. पालकमंत्री कुणाला करायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *