महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जानेवारी ।। राज्यामध्ये सध्या थंडी-पावसाचा खेळ सुरूच आहे. एकीकडे राज्यात गारठा प्रचंड वाढला आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. राज्यातील किमान तापमान ढगाळ वातावरणामुळे वाढू लागले आहे. राज्यातील मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील गारठा कमी झाला आहे. राज्यात पुढचे दोन दिवस असंच वातावरण राहिल. किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाला पोषक हवामान होत ढगाळ हवामान झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे. तापमानात वाढ होत अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या वर गेला आहे. आज उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दोन दिवसांपासून राज्याच्या बऱ्याच भागात पहाटे धुके पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान झाल्याने गारठा कमी झाला आहे. शनिवारी धुळे आणि अहमदनगर येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आज उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील काही ठिकाणी गारठा वाढला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पटलेल्या दिसत आहेत. मुंबईसह पुणे आणि काही प्रमुख शहरांमधील नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे. पण ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पिंकांचे नुकसान होत असल्याने बळीराजा चिंतेत आला आहे.