महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जानेवारी ।। आज संपूर्ण देश स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करत आहे. हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. स्वानी विवेकानंदांचे जीवनच एक शिकवण आहे. तर त्याचे विचार हे त्या जीवनाचे सार आहेत, जे आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग समजावून सांगतात आणि आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातात. ‘राष्ट्रीय युवा दिना’च्या या विशेष प्रसंगी स्वामीजींचे अनमोल विचार घेऊ या.
उठा, जागे राहा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, प्रयत्न करत राहा
स्वतःला कमकुवत समजणे हा सर्वात मोठा पाप आहे.
कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःहून शिकायला हवी. आत्म्यापेक्षा चांगला गुरू नाही.
सत्य हजार प्रकारे सांगितले जाऊ शकते, तरीही प्रत्येक सत्य असेल.
बाह्य निसर्ग हा आंतरिक स्वभावाचाच एक मोठा प्रकार आहे.
हे जग एकप्रकारची व्यायामशाळाच आहे. जिथे आपण स्वत:ला शक्तिशाली बनवण्यासाठी येतो.
विश्वाच्या सर्व शक्ती आधीच आपल्या आहेत. आपणच डोळे झाकून रडतो की किती काळोख आहे.
जग ही एक मोठी व्यायामशाळा आहे. जिथे आपण स्वतःला बळकट करण्यासाठी येतो.
हृदय आणि मनाच्या संघर्षात, हृदयाचे ऐका.
सामर्थ्य जीवन आहे, दुर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन, आकुंचन म्हणजे मृत्यू. प्रेम जीवन आहे, द्वेष मृत्यू आहे.
एखाद्या दिवशी, जेव्हा तुम्हाला कोणतीही समस्या येत नाही – तुम्ही खात्री बाळगू शकता की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.
स्वतंत्र होण्याचं धाडस करा, तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.