महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जानेवारी ।। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाचे सामने हायब्रिड मॉडेलनुसार, दुबईत खेळवले जाणार आहेत.
या स्पर्धेसाठी रविवारी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला. आता ऑस्ट्रेलियाने तगडा संघ घोषित केला आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या १५ सदस्यीय स्क्वाडची जबाबदारी पॅट कमिन्सच्या हाती सोपवण्यात आली आहे. यासह जॅक फ्रेजर , आरोन हार्डी आणि मॅथ्यू शॉर्टला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे.
Our preliminary squad for the 2025 @ICC #ChampionsTrophy is here 🔥 pic.twitter.com/LK8T2wZwDr
— Cricket Australia (@CricketAus) January 13, 2025
कमिन्सच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २०१७ मध्ये खेळली गेली होती. या स्पर्धेत पाकिस्तानने बाजी मारली होती. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती सोपवण्यात आली आहे. मात्र बॉर्डर -गावसकर मालिकेदरम्यान कमिन्स दुखापतग्रस्त झाला होता .त्यामुळे त्याला संघात तर स्थान मिळालं आहे, पण त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
या स्पर्धेसाठी सर्व संघांना ५ आठवड्यांपूर्वी संघाची यादी पाठवायची आहे. त्यानंतर सर्व संघांना संघात बदल करण्याची अनुमती दिली जाणार आहे. पॅट कमिन्स आता जरी दुखापतग्रस्त असला तरीदेखील, तो जर स्पर्धा सुरु होण्याच्या एक आठवड्याआधी पूर्णपणे फिट झाला, तर त्याला संघात कायम ठेवलं जाऊ शकतं.
मात्र जर असं झालं नाही, तर त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली जाऊ शकते. असं झाल्यास संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अनुभवी खेळाडूकडे सोपवली जाऊ शकते.