महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नांदेड – संजीवकुमार गायकवाड – दि. १४ ऑगस्ट – नांदेड जिल्यातील धर्माबाद नगरपालिकेचे मुख्यधिकारी यांची काही दिवसा पूर्वी बदली करण्यात आली या मुळे धर्माबाद शहरात कोरोना या महामारीचा जवळच असलेल्या पोयोनियर डिस्टलरी या अल्कोहोल निर्मिती करणाऱ्या कंपनीमुळे मोट्या प्रमाणात शिरकाव झाला पण शहराची संपूर्ण जबाबदारी असलेल्या मुख्याधिकारी पदचं रिकामी असल्यामुळे शहरवाशीयांची फार मोट्या प्रमाणात अडचण झाली होती. हे पद गेली कित्येक दिवसा पासून रिक्त होते.यांचा अतिरिक्त पदभार धर्माबाद पासून 40 किलोमीटर दूर असलेल्या उमरी येथील काकासाहेब डोईफोडे यांच्या कडे दिला होता.
जे की सद्या कोरोना व्हायरस चा या दोन्ही तालुक्यात फार मोठया प्रमाणात शिरकाव झाला असल्यामुळे त्यांना काही दिवस तारेवरची कसरत करावी लागली होती.पण धर्माबादचे कर्तव्य दक्ष उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी ही धुरा सांभाळून धरून मुख्यधिकारी करावयाची आवश्यक ते कामे यांनी केली होती.सुरवातीचे 4 महिने यानी व उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, पोलीस निरीक्षक सोहन माछरे व त्यांच्या टीमने धर्माबाद तालुक्यात कोरोना महामारीचा शिरकाव होऊ दिला नव्हता. पण धर्माबाद शहरापासुन काही अंतरावर असणाऱ्या अल्कोहोल निमिर्ती करणाऱ्या कंपनीतच लॉकडाऊन असतानाही एका कर्मचाऱ्याणे हेंद्राबाद येथून ये जा करीत असताना तो तपासणीत पॅझिटिव्ह आढळला त्यामुळे या आज पर्यंत शहर व तालुक्यात 99 संक्रमित झाल्याचे आहेत. या कंपनीत एकूण 400 कर्मचारी कामाला आहेत. पण कंपनीतील वेस्टेज जसेकी भंगार. भुसा. राख. लिक्विड अल्कोहोल ने आण करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. या कंपनीत काम कारणारे अधिकारी व कर्मचारी शहरातील विविध भागात वास्तव्य करून असल्यामुळे भविष्यात धर्माबाद शहराची धारावी होण्यास विलंब लागणार नाही असेही मी मा.पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कानावर टाकले होते.
येथील नगर परिषदेला कायम स्वरूपी मुख्यधीकारी नसल्यामुळे शहराची एक बाजू अपंग झाली होती.धर्माबाद शहरास एक कर्तव्य दक्ष अधिकारीची अत्तेंत गरज असल्याची बाब पालकमंत्री मा.ना. अशोकराव चव्हाण यांना निदर्शनास आणून देऊन धर्माबाद नगर पालिकेस कायम स्वरूपी मुख्याधिकारी मिळून देण्याची मागणी एका निवेदना मार्फत सौ. नीता संजीवकुमार गायकवाड यांनी केली होती त्यामागणी ची पूर्तता गंभीरता लक्षात घेऊन लवकरच आपण पूर्णवेळ मुख्याधिकारी म्हणून श्रीमती नीलम कांबळे यांची नियुक्ती केल्याबदल आम्ही सर्व शहर वासी आपले आभारी आहोत.