31मार्च 2021 नंतर पॅन कार्ड निष्क्रीय होणारं ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – पी.के.महाजन – दि. १४ ऑगस्ट -केंद्र सरकारने व आयकर विभागाने वेळोवेळी सुचीत केले आहे की आपण आपले पॅन कार्ड…आधार कार्ड शी लिंक करून घेणे. आपले आर्थीक व्यवहार तपासणी साठी पॅन कार्ड व आधार कार्ड एकमेकांशी लींक असणं आवश्यक आहे त्या मुळे सरकारने तस करणं बंधनकारक केले आहे. आयकर विवरण पत्रक भरण्यासाठी सुध्दा पॅन कार्ड हे आधार कार्ड ला लिंक असावे लागते त्या शिवाय ITR दाखल करता येत नाही.

तसेच रोजच्या जीवनात ही अनोळखी ठिकाणी आपण आपले ओळखपत्र म्हणूनही पॅन कार्ड चा वापर आपण करीत असतो. तरी सदर पॅन कार्ड हे आधार कार्ड शी लिंक करून घेणे गरजेचे आहे. लिंक करून घेण्यासाठी साईट www.incometaxindiaefiling.gov.in ह्या साइट वर जा. तीथे क्लिक करा एक विंडो येईल तीथे पुर्ण नाव टाका, पॅन कार्ड व आधार कार्ड नंबर टाका व त्या नंतर आधार कार्ड लिंक वर क्लिक करा..पॅन कार्ड व आधार कार्ड शी लिंक होईल. मात्र या साठी पॅन कार्ड व आधार कार्ड वरील नाव व जन्म तारीख सारखी असणं आवश्यक आहे. म्हणजे नावाची English अक्षर – स्पेलींग मॅच असणं आवश्यक आहे अन्यथा ते लिंक होणार नाही. 31 मार्च 2021 ही शेवटची तारीख आहे त्या नंतर पॅन कार्ड निष्क्रीय होणारं आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *