महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – पी.के.महाजन – दि. १४ ऑगस्ट – सध्या कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्वच घटकांवर परिणाम झाला आहे. इतिहासात याची नक्कीच नोंद होणार आहे. सरकारच्या शिक्षण विभागाला परीक्षा रद्द कराव्या लागल्या. शैक्षणिक वर्ष सुरु असतानाच शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून शैक्षणिक विभागाने सुद्धा परस्थितीपाहून अनेक वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. त्यातच बालभारतीकडून आता पीडीएफ स्वरुपात पुस्तके उपलब्ध झाली .
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे .त्यातच पहिली ते १२ पर्यंतची पुस्तक पीडीएफ स्वरुपात ऑनलाईन उपलब्ध झाली आहेत.
असे मिळवा ऑनलाईन पीडीएफ पुस्तक
बालभारतीने (ईबालभारती) एक संकेतस्थळ दिले आहे. http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर ईबालभारतीचे पेज दिसेल. त्यावर सिल्याबस इअरमध्ये २००६ पासून २०२० पर्यंत वर्ष दिली आहेत. त्यामध्ये ज्या वर्षाचे पुस्तक हवे आहे. त्या वर्षाला किल्क करावे.
या पेजवर बुक टाईप्समध्ये टेक्स बुक, टिचर्स हँडबुक, वर्कबुक, ऑदर बुक व किशोर खंद असे विभाग दिले आहेत. त्यातून जे हवे त्याला क्लिक करावे लागेल.
क्लासमध्ये पहिली ते १२ पर्यंतचे वर्ग दिले आहेत. याबरोबर नो क्सास असे ही ऑप्शन दिले आहे. या क्लिक केल्यानंतर काहीच दिसत नाही.
मिडीयममध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, तेलगु, कन्नड, तमीळ, बंगली आदी भाषा दिल्या आहेत.
सब्जेकटस्मध्ये भाषा (भाषेची पुस्तके), गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, पर्यावरण ऑदर आदी पुस्तके दिली आहेत.