महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जानेवारी ।। पुण्यातील गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोचे बांधकाम सुरु असताना तेथील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे सुरु राहावी यासाठी वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपाचे बदल करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहेत.
वाहतूक शाखेच्या आदेशांनुसार –
१. बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक – बाणेरकडून येणारी वाहतूक औध रोडवर वळवून राजभवन समोरील पंक्चरमधून यू-टर्न घेवून पुन्हा विद्यापीठ मार्गे शिवाजीनगरला इच्छितस्थळी जातील.
२. शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक – शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक ही पुणे विद्यापीठ चौकातून सरळ औंध रोड मार्गे इच्छितस्थळी जातीला.
३. औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक – औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक ही मिलेनियम गेट चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या गेटमधून पुणे विद्यापीठ परिसर-उजवीकडे वळून-वाय जंक्शन-विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडून इच्छितस्थळी जातील.
पुणे शहर वाहतूक शाखेने नागरिकांना बदलांची माहिती दिली आहे. एका बाजूला मेट्रोचे काम सुरु असताना दुसऱ्या बाजूला वाहतूक सुकर आणि सुरळित राहावी यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वाहतूक बदल मार्गाचा वापर करुन वाहतूक शाखेचे कर्मचारी, स्वयंसेवक यांना सहकार्य करावे असे आवाहन अमोल झेंडे यांनी केले आहे.