महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जानेवारी ।। पुणे महानगरपालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार आहे. ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने नागरिकांशी संबंधित सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन केले जाणार आहे.
राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पीएमआरडीएदेखील पाऊल उचलणार आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेची कामे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.पीएमआरडीएच्या हद्दीतील ९ तालुक्यांतील 817 गावांचा समावेश असणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये आता पेपरलेस काम होणार आहे.
काय काय सुविधा मिळणार?
स्वाक्षरीअभावी फाईल अथवा अर्ज रखडल्याचे स्टेटस समजणार
नागरिकांना घरबसल्या किंवा संस्थांना त्यांच्या कार्यालयातूनच ऑनलाइन कामकाज हाताळता येणार
बांधकाम परवानगी ते प्रशासकीय माहिती उपलब्ध करून देण्यापर्यंत सर्व कामे ऑनलाइन होणार
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जदाराला त्याची सद्यःस्थिती पाहता येणार
पुणे महानगरपालिकेचा नवा उपक्रम
पुणे महानगरपालिकेने आता कर्मचाऱ्यांसाठी नवीन उपक्रम सुरु केला आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक तणाव दूर करण्यासाठी अॅप तयार केले आहे.महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मेंटल हेल्थ ॲपची खरेदी करण्यात आली आहे.पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
अधिकारी आणि कर्मचारी यांचे आरोग्य यसाह त्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी या ॲप ची खरेदी केली आहे.सध्या या ॲपचे दोन हजार युनिट खरेदी केले जाणार आहे.