महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जानेवारी ।। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील घरात चाकू हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झालाय. मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान चोर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झाली. चोराने सैफ अली खान याच्यावर सहा ते सात वेळा चाकून सपासप वार केले. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याला शरीरावर सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत, त्यामधील दोन जखमा अतिशय खोलवर असल्याचे समजतेय.
सैफ अली खान आणि चोरामध्ये मध्यरात्री अडीच वाजता झटापट झाली. चोराने सैफ अली खान याच्यावर सपासप चाकूने वार केला. सैफ अली खान याच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर चोराकडून वार करण्यात आले. यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रिया झाल्याचे समजतेय. (Saif Ali Khan was stabbed six times, with two of the stabbings causing serious injuries)
सैफ अली खान याच्या हाताला आणि मानेला खोलवर जखमा झाल्या आहेत. त्याशिवाय पाठीच्या कण्यावरही जखम झाली आहे. सैफच्या मानेला १० सेंटीमीटर जखम झाली आहे. वांद्रे येथील ३ बीएचके या अलिशन घरात सैफ अली खान होता, त्यावेळी मध्यरात्री चोर घुसले. चोरामध्ये आणि सैफमध्ये झटापट झाली. यात सैफ गंभीर जखमी झाला. त्याशिवाय कर्मचारीही जखमी झाल्याचे समजतेय.