Post Office Scheme: दर महिन्याला ५००० रुपये गुंतवा अन् ८ लाख मिळवा; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जानेवारी ।। प्रत्येकजण आपल्या भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर भविष्यात कधीच आर्थिक अडचण भासणार नाही. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्ही जर ८ लाख रुपये जमा करु शकतात. (Post Office Recurring Deposit Scheme)

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला दर महिन्याला फक्त ५००० रुपये गुंतवायचे आहे. ५००० रुपये गुंतवून तुम्ही ८ लाख रुपये जमा करु शकतात. या योजनेच्या आधारावर तुम्हाला लोनदेखील मिळू शकते.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्हाला ६.७ टक्के व्याजदर मिळते. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीमवर सरकार दर तीन महिन्यांनी संशोधन करते. त्यानंतर व्याजदर ठरवते. या योजनेत तुमच्या गुंतवणूकीवर चक्रवाढ व्याजदेखील लागते. (Post Office Scheme)

पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेत तुम्ही दर महिन्याला ५००० रुपयांची गुंतवणूक करा. त्यानंतर तुम्ही मॅच्युरिटी पीरियडपर्यंत ३ लाख रुपये जमा कराल. यावर ६.७ टक्के व्याजदर द्यावे लागते. त्यामुळे ५६,८३० रुपये व्याज तुम्हाला मिळेल. पाच वर्षात तुम्हाला ३,५६,८३० रुपये मिळतात.

पाच वर्षात रिकरिंग डिपॉझिट योजनेत १० वर्षांसाठी ६ लाख रुपये गुंतवू शकतात.यावर तुम्हाला २,५४,२७२ रुपये मिळणार आहे. त्यानंतर १० वर्षात ८,५४,२७२ रुपये जमा होणार आहे.

तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट उघडू शकतात. यामध्ये तुम्ही १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेत पाच वर्षांचा मॅच्युरिटी पीरियड आहे. त्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *