महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जानेवारी ।। लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार असून, वाढीव रकमेबाबत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget) निर्णय घेतला जाणार आहे. जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपयांचा असणार आहे. दरम्यान येत्या आठ ते दहा दिवसात लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. या महिन्याचा लाडक्या बहिणीचा हफ्ता 26 जानेवारीच्या आसपास दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.