भारतीय संघात होणार नवीन प्रशिक्षकाची एंट्री, कोणाची होणार निवड, समोर आली महत्वाची अपडेट.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जानेवारी ।। भारतीय संघात आता नवीन प्रशिक्षक येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर आता भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत. पण भारताच्या संघात आता कोणाची निवड होणार आहे, ही महत्वाची माहिती आता समोर आली आहे.


भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात्या दौऱ्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताला WTC Final मध्येही पोहोचता आले नाही. त्यामुळे आता बीसीसीआयने या पराभवानंतर आता भारतीय संघात मोठा बदल करणार असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने गंभीर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये गंभीर यांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघात आता नवीन प्रशिक्षक येणार आहे.

भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक कोण असतील, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण बीसीसीआयमधील सूत्रांनी याबाबतची माहिती आता दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता भारतीय संघात फलंदाजी प्रशिक्षक आणला जाणार आहे. भारतामधील स्थानिक क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने आपले चांगलेच नाव कमावले, अशी व्यक्ती आता भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी येणार असून त्यांचे नाव सितांशु कोटक असे आहे. बीसीसीआयचा कोटक यांच्या नावाला जोरदार पाठिंबा आहे.

सितांशु कोटक यांची आतापर्यंतची कारकिर्द….
सितांशु कोटक हे सौराष्ट्रचे खेळाडू होते. भारतीय स्थानिक क्रिकेटमधील दी वॉल, अशी उपाधीही त्यांना मिळाली होती. रणजी क्रिकेट स्पर्धेत कोटक यांनी चांगलेच नाव कमावले होते. त्यानंतर कोटक हे सौराष्ट्रचे प्रशिक्षक बनले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्येही त्यानंतर त्यांना जाण्याची संधी मिळाली. अकादमीमध्ये त्यांनी बऱ्याच भारतीय खेळाडूंना मदत केली. त्यानंतर आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाचे सहप्रशिक्षक म्हणूनही ते काम पाहत आहेत. भारताच्या ‘अ’ संघाचे गेल्या चार वर्षांपासून ते प्रशिक्षकपद सांभाळत आहेत. त्यामुळे प्रशिक्षणाचा चांगलाच अनुभव कोटक यांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *