महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जानेवारी ।।पिंपरी-चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील महानगरपालिकेच्या शाळेला सरप्राईज भेट दिली आहे. दादा भुसे हे 20 मिनिट पिंपळे निलख मधील शाळेत होते. भुसेंनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अचानक शालेय मंत्री शाळेत आल्याने शिक्षकांची मात्र धांदल उडाली. शालेय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक तपासणी करत काही प्रश्नही विचारले.