महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जानेवारी ।। भारतीय रेल्वेने प्रवाशांची सोय आणि त्यांच्या वाढत्या गरजा लक्षात घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांना आता विना आरक्षणाशिवाय फक्त तिकीट काढून प्रवास करता येणार असून, या सेवेमुळे प्रवाशांना काहीसा दिला मिळणार आहे. लांबचा पल्ला गाठणारे ट्रेन आता विना आरक्षणाशिवाय प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहेत. या गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना फक्त तिकीट काढावी लागणार आहे. तसेच यूटीएस अॅपद्वारेही आपण तिकीट बुक करू शकतो.
कोणत्या गाड्या धावतील विना आरक्षण?
विना आरक्षणाच्या रेल्वे डब्यांमध्ये सामान्य वर्ग आणि आसन श्रेणीचे डबे असतील. आयआरसीटीसीच्या १० नवीन गाड्या देशातील प्रमुख शहरांना जोडतील. या गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून, रिझर्वेशन करण्याची देखील चिंता मिटणार आहे. काही मिनीटात ऐनवेळी फक्त तिकीट काढून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. ही रेल्वे सेवा २० जानेवारीपासून प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार आहे.
दिल्ली – जयपूर एक्सप्रेस,दिल्लीहून सकाळी ६ वाजता निघेल, जयपूर येथे दुपारी १:३० वाजता पोहचेल.
मुंबई – पुणे सुपरफास्ट, मुंबईहून सकाळी ७:३० वाजता निघेल आणि ११:०० वाजेच्या दरम्यान पुण्यात पोहचेल.
कोलकाता – पाटणा इंटरसिटी, कोलकाता येथून सकाळी ५ वाजता निघेल आणि पाटणा येथे दुपारी २ वाजता पोहचेल.
चेन्नई – बंगळूरू एक्सप्रेस, चेन्नईहून सकाळी ८ वाजता निघेल आणि दुपारी ३:३० वाजता बंगळूरू येथे पोहचेल.
अहमदाबाद – सुरत फास्ट, अहमदाबाद येथून सकाळी ७ वाजता प्रस्थान होईल आण दुपारी १२:३० वाजता सुरतला पोहचेल.