बीएसएनएलचा स्वस्त प्लान १५ ऑगस्टपासून सुरू होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. १४ ऑगस्ट – भारत संचार निगम लिमिटेडने ८० दिवसांच्या व्हॅलिडीटीचा एक स्वस्त प्लान लॉन्च केला आहे. या प्लान ३९९ रूपयांचा आहे. यात प्रतिदिवस २५० रूपयांची कॉलिंग देखील दिली जात आहे. सोबत १जीबी डाटासह १०० एसएमएस देखील मिळणार आहेत, हा नवीन प्लान १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

लिमिट संपल्यावर युझर्सला १ रूपये प्रति मिनिट लोकल कॉल द्यावा लागणार आहे. तर दुसरीकडे लँडलाईन आणि एसटीडी कॉल्ससाठी युझर्सला १ रूपये ३० पैसे प्रति मिनिट द्यावा लागत आहे.

नव्या प्लानशिवाय बीएसएनएल आपला ३९९ रूपयांचा आणि १६९९ रूपयांचा, हे दोन्ही प्लान बंद करणार आहे. १५ ऑगस्टपासून हे प्लान बंद होणार आहेत, त्या जागी ३९९ वाला नवीन प्लान अॅक्टीव्हेट होणार आहे. हे प्लान सध्या चेन्नई आणि तामिळनाडू सर्किटमध्ये आहेत, आणि जे प्लान रद्द झाले आहेत, ते देखील याच सर्किटचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *