महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. १४ ऑगस्ट – यंदा 74 व्या स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचं सावट आहे. असं असलं तरीही लाल किल्ल्यावर आटोपशीर आणि सर्व सुरक्षांची काळजी घेऊन हा कार्यक्रम पार पडणार आहे. लाल किल्ल्यावर कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
यंदा आर्थिक पॅकेज, हेल्ड कार्डसंदर्भात मोठी घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी उद्योगासाठी मोठ्या घोषणा शक्य आहेत. आत्मनिर्भर भारतासाठी काय रणनिती असेल यासंदर्भात पंतप्रधान मोदी संबोधन करू शकतात. रोजगार, गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील याचा उल्लेखही ते करतील असं सांगितलं जात आहे.
#AwaazExclusive। 15 अगस्त को लाल किले के प्राचीर से होने वाला प्रधानमंत्री का संबोधन इस बार काफी अलग होने वाला है। सीएनबीसी आवाज को एक्सक्लूसिव जानकारी मिली है कि इसमें अगले आर्थिक पैकेज की झलक देखने को मिल सकती है। और क्या कुछ बोल सकते हैं प्रधानमंत्री बता रहे हैं @RoyLakshman । pic.twitter.com/CzXBqhrQKw
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) August 13, 2020
दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करतात. मागच्या वर्षी तीन तलाक आणि कलम 370 संदर्भात घोषणा केली होती. राष्ट्रीय सुरक्षा स्वास्थ मिशनचा शुभारंभ लाल किल्ल्यावरून केला जाऊ शकतो असाही कयास आहे.
Health ID Card योजना काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ च्या धर्तीवर ‘वन नेशन वन हेल्थ कार्ड’ आणण्याची तयारी करत आहेत. या योजनेंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचा आरोग्याचा डेटा एका ठिकाणी मिळू शकणार आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीचं हेल्थ कार्ड तयार केलं जाणार आहे. यामध्ये डॉक्टरांची माहिती आणि सेवांची माहिती उपलब्ध असणार आहे.