Gold Silver Price: सोन्याची भाव वाढ सुरुच ; चांदीची चकाकी मात्र फिकी ; पाहा आजचा भाव किती ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ जानेवारी ।। २०२५ या वर्षात सोने आणि चांदीच्या भावात बरेच चढ उतार पाहायला मिळाले. लग्नाचा सिझन असल्याने सोनं भरारी घेतानाच जास्त दिसले. मागील वर्षात सादर झालेल्या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीची स्टॅम्प ड्युटी हटवण्यात आली आणि त्यानंतर भावात खूपच फरक जाणवला. सोनं आणि चांदीच्या भावात घसरणीची लाट पसरलेली दिसली. या वर्षीचा अर्थसंकल्प पुढील महिन्यात १ फेब्रुवारी २०२५ ला जाहीर होणार आहे.

सोने-चांदीचा वायदे दर
वर्षाचा पहिला महिना आता संपत आला असून सोन्याचे दर वाढत असून MCX वर, फेब्रुवारी सोन्याचा वायदा सकाळी १०.०५ वाजता ३०९ रुपयांच्या वाढीसह ७८,८५३ रुपयांवर पोहोचला, जो शेवटच्या सत्रात रु. ७८,५५४ वर क्लोज झाला आणि आज रु. ७८,९८४ वर उघडला. चांदीचे दर घसरलेले असून ९२,१११ रुपये प्रति किलोने आहे पण सध्या उच्चांकी किंमतीवरून चांदी प्रचंड स्वस्त झाली आहे.

देशांतर्गत सराफा बाजारातील सोन्याची किंमत
या काळात, देशांतर्गत सराफा बाजारातही आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी भाव फ्लॅट असल्याचे दिसले. २४ कॅरेट सोन्याच्या किमत ८१,२३० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ७४,५०० रुपये तर त्याचवेळी, भारतीय ग्राहकांना आज चांदी ९२,१११ रुपये प्रति किलोग्रॅम या दराने उपलब्ध आहे.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७४,५०० रुपये ७४,५०० रुपये
पुणे ७४,५०० रुपये ७४,५०० रुपये
नागपूर ७४,५०० रुपये ७४,५०० रुपये
कोल्हापूर ७४,५०० रुपये ७४,५०० रुपये
जळगाव ७४,५०० रुपये ७४,५०० रुपये
ठाणे ७४,५०० रुपये ७४,५०० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ८१,२३० रुपये ८१,२३० रुपये
पुणे ८१,२३० रुपये ८१,२३० रुपये
नागपूर ८१,२३० रुपये ८१,२३० रुपये
कोल्हापूर ८१,२३० रुपये ८१,२३० रुपये
जळगाव ८१,२३० रुपये ८१,२३० रुपये
ठाणे ७८,७१० रुपये ७८,७१० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *