महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ जानेवारी ।। प्रयागराज मध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. या ठिकाणी देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. महाकुंभात नद्यांच्या संगमात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या ठिकाणी आलेले साधू, संत, तपस्वी यांचे फाटो आणि व्हिडिओ सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच एक मस्कुलर बाबा, जे आपल्या उंची आणि पिळदार शरीरयष्टीमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. इतकच काय भगवान परशुरामाशी त्यांची तुलना केली जात आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांमध्ये तुफान व्हायरल होत आहेत. (Maha Kumbh Mela 2025)
प्रयागराजच्या महाकुंभात सध्या एका अनोख्या संताने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे. या बाबांची पिळदार शरीरयष्ठी, ताडमाड उंची, पांढरीशुभ्र दाढी आणि करारी आणि तेजपुंज चेहऱ्यावरचे भाव यामुळे ते प्रयागराजमध्ये आणि सोशल मीडियावर चांगलेच चमकत आहेत. त्यांचे अनेक फोटो, व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान शेअर होत आहेत. या बाबांना जेंव्हा कोणी बघतो तेंव्हा तो बघतच राहतो.
कोण आहेत मस्कुलर बाबा?
या बाबांचे नाव आत्म प्रेम गिरी असल्याचं म्हंटलं जातं. हे बाबा नेपाळमध्ये गेल्या ३० वर्षांपासून राहत आहेत. इतकच नाही तर हे बाबा मुळचे रशियाचे आहेत. गेल्या ३० वर्षांपासून त्यांनी आपले जीवन सनातन धर्मासाठी समर्पित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियामध्ये ते शिक्षक होते. त्यांनी आपला तो पेशा सोडून सनातन धर्माची सेवा ते करत हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. सध्या हे बाबा महाकुंभात आले आहेत. आपल्या प्रसन्न आणि करारी चेहऱ्यावरील भावमुंद्रांमुळे ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.
अनेक फोटो व्हायरल
सोशल मीडियावर या मस्कुलर बाबांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर आणि व्हायरल होत आहेत. काही फोटोंमध्ये ते जिम मध्ये डंबेल्स उचलताना दिसत आहेत. तर काही फोटोंमध्ये ते ध्यानाला बसलेले दिसत आहेत. त्यांच्या शरीरावर भगवे वस्त्र, गळ्यात रूद्राक्ष माळा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज त्यांना गर्दीतही इतरांपासून वेगळे करते. सोशल मीडियावर तर काहींनी त्यांना भगवान परशुराम म्हणून नामकरण करत आहेत.
या मस्कुलर बाबांचे म्हणणे आहे की, त्यांनी आपले जीवन हिंदू धर्म आणि सनातनाच्या प्रचारासाठी समर्पित केले आहे. बाबा नेपाळमध्ये राहतात आणि आपले जीवन हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार करण्यात व्यतीत करत आहेत. सोबतच ते जूना आखाड्याचे सदस्यही आहेत.