Walmik karad : वाल्मिक ला जेल की बेल? आज होणार सुनावणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ जानेवारी ।। Walmik karad News Update : खंडणी प्रकरणात कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराड याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. वाल्मिक कराड याला पुन्हा कोठडी मिळणार की बेल मिळणार? यावर सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराड याने जामीनासाठीही कोर्टात धाव घेतली आहे, त्याबाबतचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. आज दुपारी कराडला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेय. मागील सुनावणीवेळी खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्यानंतर वाल्मीक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोर्टाने मकोका गुन्ह्यात वाल्मीक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र ही पोलीस कोठडी आज संपली आहे. कराडच्या मकोका गुन्ह्यात आज बीड जिल्हा न्यायालयात दुपारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, वाल्मीक कराडला बीड जिल्हा न्यायालयात ज्यावेळेस हजर केलं होतं. त्यावेळेस मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे त्यानंतर सुदर्शन घुलेसह सहा जणांची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली होती. त्यामुळे आजची कराडची सुनावणी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सुनावणी कडे आता राज्याचे लक्ष लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *