![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ जानेवारी ।। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलाच्या अकाउंटला पैसे येतात. गेल्या अनेक दिवसांपासून महिला जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.जानेवारीचा हप्ता आता लवकरच महिलांना मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता मकरसंक्रांतीच्या दिवशी येईल, असं सांगण्यात आले होते. परंतु त्या दिवशी पैसे न आल्याने महिलांना निराशा झाली होती.मात्र, आता २६ जानेवारीला महिलांना हप्ता मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana)
आज २३ तारीख आहे.फक्त ३ दिवसांतच महिलांना पैसे मिळणार आहेत. २६ जानेवारीला हप्ता मिळणार, अशी घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. त्यामुळे २६ जानेवारीपर्यंत महिलांना पैसे मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या सुरु आहेत. हजारो अपात्र महिलांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. तर अनेक महिला अजूनही अर्ज माघारी घेत आहेत. दरम्यान, खोटी माहिती भरुन या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे पैसे परत घेतले जाणार असल्याची घोषणा आदिती तटकरे यांनी केली होती. त्यामुळे आता खोटी माहिती भरुन अर्ज करणाऱ्या महिलांवर टांगती तलवार आहे. (Ladki Bahin Yojana Update)
लाडकी बहीण योजनेत महिलांना निधी वाढवून देणार असल्याचे सांगितले होते. लवकरच महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, याबाबत अद्याप संभ्रम सुरु आहे. बजेटनंतर मार्च महिन्यात पैसे येतील, असं काही नेते सांगत आहेत. तर अद्याप याबाबत कोणतीही शिफारस अर्थ मंत्रालयाकडे केली नाही, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे या योजनेत २१०० रुपये कधी मिळणार, याबाबत कोणताही निर्णट झालेला नाही.
