![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ जानेवारी ।। दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. पण यंदा २६ जानेवारीला रविवार आला आहे. यामुळे अनेक लोक फिरायला जाण्याचा विचार करतात. पण तुम्हाला एक किंवा दोन दिवसांसाठी फिरायला जायचे असेल तर पुण्याजवळील फुढील १० ठिकाणांना भेट देऊ शकता. ज्यामुळे सुट्टींचा आनंद द्विगुणित होईल. तुम्ही कुटूंबासोबत किंवा एकटे या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
पचगाणी (Panchgani)
प्रजासत्ताक दिनानिमित्त पचगाणीला फिरायला जाऊ शकता. हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. तुम्ही येथे निसर्गसौंदर्यांचा आनंद देऊ शकता.
महाबळेश्वर (Mahabaleshwar)
महाराष्ट्रातील महाबळेश्वर एक निसर्गसुंदर आणि थंड हवेचे ठिकाण आहे. येथे पर्यटक भेट देण्यासाठी येतात. येथील स्ट्रॉबेरी खुप प्रसिद्ध आहे. येथे आल्यावर तुम्ही स्ट्रॉबेरीबासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे.
ताम्हणी घाट (Tamhini Ghat)
पुण्याजवळी ठिकाणांपैकी एक म्हणजे ताम्हणी घाट. ताम्हिणी घाट महाराष्ट्रातील एक घाटरस्ता आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगांव यांना जोडतो. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. तुम्ही येथे रोजच्या धावपळ आणि प्रदूषणापासून निवांत वेळ घालवू शकता.
Rajmachi Fort (राजमाची घाट)
राजमाची हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ एप्रिल, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. यंदा प्रजास्ताक दिन खास बनवायचा असेल तर या किल्ल्या नक्की भेट देऊ शकता.
Bhimashankar (भीमाशंकर)
भीमाशंकर हे महादेवाचे मंदिर आहे. हे एक प्रमुख तीर्थस्थान आहे. तसेच १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तुम्ही प्रजासत्तादिनानिमित्त लोणावळाला भेट देऊ शकता.
माथेरान( Matheran)
माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. तुम्ही यंदा जोडीदारासोबत किंवा कुटूंबासोबत प्रजासत्तादिनानिमित्त माथेरानला भेट देऊ शकता.
Lonavala (लोणावळा)
लोणावळा हे महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. लोणावळ्याची चिक्की खुप प्रसिद्ध आहे. तुम्ही प्रजासत्तादिनानिमित्त लोणावळाला भेट देऊ शकता.
खंडाळा (Khandala)
खंडाळा हे महाराष्ट्राच्या पश्चिम भारतातील पश्चिम घाट पर्वतातील एक हिल स्टेशन आहे. हे सनसेट पॉइंट आणि राजमाची पॉइंटसह राजमाची किल्ल्याच्या दृश्यांसह आकर्षक ठिकाणांचे घर आहे. कुने धबधबा हा नाट्यमय दरीत सेट केलेला 3-स्तरीय धबधबा आहे. ताम्हिणी घाट पर्वताच्या खिंडीभोवती धबधबे आहेत. तुम्ही यंदा जोडीदारासोबत किंवा कुटूंबासोबत प्रजासत्तादिनानिमित्त खंडाळ्याला भेट देऊ शकता.
Sinhagad Fort (सिंहगड)
तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंहगडाला भेट देऊ शकता. सिंहगड पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. तुम्ही यंदा जोडीदारासोबत किंवा कुटूंबासोबत प्रजासत्तादिनानिमित्त सिंहगडला भेट देऊ शकता.
पवना लेक
प्रजासत्ताक दिनानिमित्त पवना लेकला जाऊ शकता. पुण्यापासून ५० किमी अंतरावर आहे. तुम्ही वनडे ट्रिपसाठी देखील जाऊन येऊ शकता. या तलावाजवळ कॅम्पिंगचा देखील आनंद घेऊ शकता.
टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.
