महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ जानेवारी ।। विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपये देण्याची घोषणा महायुतीनं केली होती. यावरुन सध्या बराच खल सुरु आहे. त्यातच आता जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तसंच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या दोन दिवसात जमा होणार आहेत. पैसे खात्यात जमा झाले आहेत किंवा नाही हे कसं चेक करायचं . जाणून घ्या
सरकारनं पाळला शब्द
लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी घेतल्याचं पडताळणीत उघड झालं आहे. यापार्श्वभूमीवर योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? याबाबत वारंवार विचारणा केली जात होती. त्यावर बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जानेवारीचा हप्ता २६ जानेवारीपूर्वी खात्यांमध्ये जमा होईल अशी ग्वाही दिली होती.
पण प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जनेवारी जवळ येत आला तरी हप्ता जमा होत नसल्यानं नेमकं काय झालंय? याचा विचार करत लाडक्या बहिणींमध्ये अस्वस्थता होती. पण अखेर शुक्रवारी २४ जानेवारीपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
खात्यात पैसे आले का? कसं चेक कराल?
लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट बँक हस्तांतरण पद्धतीनं अर्थात डीबीटीद्वारे जमा होत असल्यानं जर पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये जमा झाले असतील तर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येईल. जर मेसेज आला नसेल तर तुमच्या बँकेच्या अॅपमध्ये जाऊन तिथे डिटेल्स या ऑप्शनवर क्लीक करुन खात्यात पैसे जामा झालेत का? हे तुम्हाला चेक करता येईल. तसंच तुम्ही बँकेत जाऊन देखील पैसे आलेत की नाही ते चेक करु शकतात.