महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ जानेवारी ।। पुणेकरांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे मेट्रोकडून विशेष सवलत देण्यात आली आहे. ११८ रुपयांचं पुणे मेट्रो ट्रांझिट कार्ड २६ जानेवारीला प्रवाशांना फक्त २० रुपयांत मिळणार आहे. या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार १० टक्के आणि शनिवार – रविवार ३० टक्के सवलत मिळणार आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी पुणे मेट्रोने विशेष सवलत दिली आहे. पुणे ‘एक पुणे ट्रांझिट कार्ड’ मेट्रोचे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सवलतीमध्ये उपलब्ध असणारं आहे. पहिल्या ५ हजार प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह हे कार्ड उपलब्ध असणार आहे. यात ११८ रुपये शुल्क असणारे हे कार्ड २६ जानेवारीला प्रवाशांसाठी केवळ २० रुपयांत उपलब्ध असणार असल्याची माहिती पुणे मेट्रो प्रशासनाने दिली आहे. या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार १० टक्के सवलत आणि शनिवार-रविवारी ३० टक्के सवलत मिळणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी मेट्रोचा वापर करावा, यासाठी ही खास सोय प्रजासत्ताकदिनी पुणे मेट्रोने दिली आहे.