महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ जानेवारी ।। Pakistan vs West Indies 2nd Test Multan: पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. विंडीजने पहिल्या कसोटीत मार खाल्यानंतर मुलतान कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करून विंडीजला ११.३ षटकांत ७ धक्के बसले. फिरकीपटू Nauman Ali ने १२ व्या षटकात जस्टीन ग्रेव्ह्स, टेव्हिन इमलाच व केव्हिन सिनक्लेअर यांना बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली. पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हॅटट्रिक घेणारा तो पहिला फिरकीपटू ठरला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या विंडीजला दुसऱ्याच षटकात कशीफ अलीने धक्का दिला. मायकल लुईस ( ४) बाद झाल्यानंतर पुढच्या षटकात साजीत खानने विंडीजला आमीर जंगू भोपळ्यावर बाद झाला. पाकिस्तानचे फिरकीपटू नोमान अली व साजीद खान यांमनी विंडीजच्या फलंदाजांना तालावर नाचवले. ११.३ षटकांत विंडीजचे ७ फलंदाज ३८ धावांत माघारी परतले होते. काव्हेज हॉ व व गुडाकेश मोती यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, अब्रार अहमदने ही जोडी तोडली. हॉज २१ धावांवर माघारी परतल्याने विंडिजची अवस्था ८ बाद ५४ अशी झाली.
𝐎𝐧𝐞 𝐢𝐧𝐜𝐫𝐞𝐝𝐢𝐛𝐥𝐞 𝐟𝐞𝐚𝐭! 😍
Hat-trick hero Noman Ali makes history in Multan 🙌#PAKvWI | #RedBallRumble pic.twitter.com/2xRLeYpVXl
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 25, 2025
कशीफ अलीने घेतलेली विकेट्स ही पाकिस्तानात ६० फलंदाज बाद झाल्यानंतर जलदगती गोलंदाजाला मिळालेली पहिली विकेट ठरली. पाकिस्तानाकडून नोमान अली हा कसोटीत हॅटट्रिक घेणारा पहिला फिरकीपटू ठरला. पाकिस्तानकडून वसमी आक्रमने १९९९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन हॅटट्रिक घेतल्या होत्या. त्यानंतर २००० मध्ये अब्दुल रझाकने व २००२ मध्ये मोहम्मद सामीने श्रीलंकेविरुद्धच हॅटट्रिक नोंदवली. २०२० मध्ये नसीम शाहने बांगलादेशविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली.
