महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जानेवारी ।। पुणेकरांचा प्रवास आता आणखी सोयीस्कर होणार आहे. पुणे मेट्रोने रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता रात्री प्रवास करता येणार आहे.
पुणे मेट्रोने आता सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे. प्रजासत्ताक दिनापासून पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
प्रवाशांना मेट्रोने अधिक सुलभ आणि जलद प्रवास करता यावा, यामुळेच पुणे मेट्रोने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुणे मेट्रोचे ‘एक पुणे ट्रांझिट कार्ड’ 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी पहिल्या 5000 प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह उपलब्ध असतील. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सोपा होणार आहे.
या ट्रांझिट कार्डमुळे पुणेकरांच्या पैशांची बचत होणार आहे. नेहमी ११८ रुपयांना असणारे हे कार्ड प्रवाशांना फक्त २० रुपयांत उपलब्ध होणार आहे. यामुळे पुणेकर दिवसभर २० रुपयांत प्रवास करु शकणार आहेत. हे कार्ड घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे तुम्ही हे कार्ड लगेच बनवून घेऊ शकतात.
घटनास्थळी एक सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये विभूने लिहिलं आहे की, माझे आई, वडिल, भाऊ सगळे चांगले आहेत. मला त्यांचा काही त्रास नाही. मी माझ्या मित्रांकडे आत्महत्या करत आहे.
मेट्रोचे नवीन वेळापत्रक
पीसीएमसी ते स्वारगेट पर्पल लाइन मेट्रोसेवा सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरु असणार आहे. सकाळी ६ ते ८, ११ ते ४ आणि ८ ते रात्री १० वाजेपर्यंत मेट्रो दर १० मिनिटांनी सुरु राहणार आहे. तर रात्री १० ते रात्री ११ वाजेपर्यंत १५ मिनिटांनी मेट्रो सुरु असणार आहे. सकाळी ८ ते ११ गर्दीच्या वेळेत आणि दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत मेट्रो दर ७ मिनिटांनी सोडण्यात येणार आहे.अॅक्वा लाइन वनाझ ते रामवाडी येथेही याचसारखे वेळापत्रक असणार आहे.