![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जानेवारी ।। प्रयागराज येथे महाकुंभमेळा होत आहे. महाकुंभमेळ्यात अमृत स्नान करण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. यामुळे प्रयागराज येथे चेंगराचेंगरी झाली. यात दहापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी भाविकांची खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे. जवळपास ८ ते १० कोटी भाविक प्रयागराज येथे उपस्थित होते. कालदेखील साडेपाच लोकांनी महाकुंभमध्ये स्नान केले होते. भाविकांची संगमावर खूप जास्त गर्दी आहे. त्यामुळेच आजची घटना घडली. परंतु तिथे प्रशासनाचे लक्ष आहे.रात्री २ ते ३ वाजताच्या मध्ये आखाडा स्नानच्या मार्गावर ही घटना घडली आहे. यासाठी तिथे बॅरिकेट्सदेखील लावले होते.यामुळे अनेक भाविक जखमी झाले आहे.या भाविकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. काही भाविक गंभीर जखमी आहेत.
काल मौनी अमावस्येची सुरुवात झाल्यापासून प्रशासन काम करत आहे. संध्याकाळी ६-७ वाजल्यापासूनच प्रशासन काम करत आहे.प्रयागराजमध्ये महाकुंभ येथे स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांची चौकशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीदेखील याबाबत नेहमी चौकशी केली आहे.
आम्ही सुरुवातीपासूनच भाविकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या स्नानासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या प्रयागराजमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही आखाडा परिषदेशी संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.भाविकांच्या सुरक्षेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच काम करत आहे. या संपूर्ण १२ ते १५ किलोमीटरच्या पट्ट्यात तुम्ही कुठेही स्नान करु शकतात. संगमाच्या इथे येऊन स्नान करणे गरजेचे नाही, असं ते म्हणाले.
गर्दी बघता काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक लोकांना श्वासाचा त्रास आहे, काही लोक म्हातारे आहेत काही लहान आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी.तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जिथे आहात तिथेच स्नान करा.
मौनी अमावस्येचा मुहूर्त रात्रभर आहे. त्यामुळे भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. त्यामुळे सर्व भाविकांना स्नान करण्याची संधी मिळेल. तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असंही त्यांनी सांगितलं.
