महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ ऑगस्ट – पुणे – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून आपला मोठा निर्णय जाहीर केला. वर्ल्ड कप 2019 नंतर धोनी यंदा आयपीएलमधून क्रिकेटच्या मैदानात परतणार होता, पण ही स्पर्धा 29 मार्चपासून सुरू होणार होती. तथापि जागतिक साथीच्या कोरोना विषाणूने ब्रेक लावला आणि स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब झाली. आता ही स्पर्धा सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
https://www.instagram.com/p/CD6ZQn1lGBi/
टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यापाठोपाठ लगेचच धोनीचा खास मित्र आणि त्याचा आयपीएलच्या चेन्नईच्या टीममधला सहकारी सुरेश रैनानेही निवृत्ती घेतली आहे. धोनीला शुभेच्छा देताना सुरेश रैनानेही त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. ‘तुझ्याबरोबर खेळताना खूप आनंद मिळाला. मला तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे. याप्रवासात मीही तुझी साथ द्यायला आलो आहे. धन्यवाद भारत, जय हिंद’, अशी इन्स्टाग्राम पोस्ट रैनाने शेयर केली आहे.