Union Budget 2025: आता देशभरातही ‘लाडकी बहीण’? ‘लक्ष्मी’चं नाव घेत मोदींचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ जानेवारी ।। महाराष्ट्रात मोठ्या राजकीय उलथापालथीसाठी कारणीभूत ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं आता केंद्र सरकारला देखील भूरळ घातल्याचं दिसतंय. कारण उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी अशाच एखाद्या योजनेची घोषणा होऊ शकते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी लक्ष्मीचं नाव घेत याचे संकेत दिले आहेत.

सध्या महिला मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांनी आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यांना मोठ्या वोटबँकेच्या रुपानं पाहिलं जात आहे. असं मानलं जातं की महिला मतदारांकडं निवडणुकांचे निकाल बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळं जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या घोषणापत्रात महिलांच्या हिताच्या दृष्टीनं घोषणा केलेल्या दिसतात. महिलांसाठी ते नव्या योजना देखील लॉन्च करत आहेत. आलिकडेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणण्यात आली होती.

या योजनेला तुफान प्रतिसाद मिळाला. त्याचा भरपूर फायदा महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यासाठी झाला. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीच्यावेळी देखील भाजपप्रणित एनडीएनं महिलांसाठी लोकसभा आणि विधानसभेसाठी 33 टक्के आरक्षण विशेष अधिवेशन घेऊन मंजूर करुन घेतलं होतं. यानंतर भाजप पुन्हा सत्तेत आलं होतं.

लक्ष्मीचं नाव घेत PM मोदींचे संकेत
दरम्यान, उद्या लोकसभा निवडणुकीनंतरच पहिलंच पूर्ण बजेट सादर होणार आहे. हे बजेट महिलांसाठी विशेष असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बजेट अधिवेशन सुरु होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं. मोदी म्हणाले, हे बजेट सत्र विकसित भारताचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नवी ऊर्जा आणि भरोसा देण्याचं कम करेल. मी देवी लक्ष्मीला प्रार्थना करतो की, देवीनं गरीब, मध्यम वर्गाला आपला आशीर्वाद द्यावा. सर्वसमावेशकता, नवकल्पना आणि गुंतवणूक आमच्या रोडमॅमचा आधार असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *