महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ फेब्रुवारी ।। भारतामध्ये सर्वात जास्त टॅक्स कोण भरतं, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. अर्थात यामध्ये दिग्गचे अभिनेते, क्रिकेटर्स, उद्योगपती यांचा समावेश असतो. फॉर्च्युन इंडियाने सप्टेंबर महिन्यामध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. यामध्ये २०२४ वर्षातील भारतातल्या श्रीमंत लोकांचा यादी देण्यात आली होती. या रिपोर्टमध्ये केवळ नेटवर्थच नाही तर त्यांच्याकडून जमा करण्यात आलेल्या टॅक्सचीही माहिती देण्यात आलेली होती.
मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कोणी किती टॅक्स भरला याची माहिती फॉर्च्युन इंडियाच्या रिपोर्टमध्ये आहे. रिपोर्टनुसार सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये दिग्गज अभिनेते शाहरुख खान टॉपवर आहेत. २०२३-३४ या वर्षासाठी शाहरुख खानने अभिनेता अक्षय कुमारला मागे टाकलं आहे. किंग खानने या वर्षी ९२ कोटी रुपये अॅडव्हान्स टॅक्स जमा केला आहे.
शाहरुख खान याच्यानंतर तमिळ सुपरस्टार थलापती विजय याने ८० कोटी रुपये, सलमान खानने ७५ कोटी रुपये, तर बिग बी अभिताभ बच्चन यांनी ७१ कोटी रुपये टॅक्स जमा केला आहे. याशिवाय अजट देवगन, रणबीर कपूर, ऋतिक रोशन, शाहीद कपूर, पंकज त्रिपाठी हेसुद्धा सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या यादीमध्ये आहेत.
याशिवाय करीना कपूरने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २० कोटी रुपये, कटरिना कैफने ११ कोटी रुपये अॅडव्हान्स टॅक्स भरला आहे. टॅक्स भरण्याच्या हिशोबाने बघितलं तर या दोघी बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्या आहेत.
क्रिकेट विश्वातील खेळाडूंचा विचार केला तर क्रिकेटर विराट कोहली सर्वात मोठा टॅक्सपेयर ठरला आहे. विराटने ६६ कोटी रुपये टॅक्स जमा केला आहे. याशिवाय तो देशातला सर्वात मोठा श्रीमंत खेळाडू ठरला आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार एसएस धोनीया नंबर येतो. त्याने ३८ कोटी रुपये टॅक्स भरला आहे.
दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांचंही नाव यादीमध्ये आहे. तसेच हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत हेसुद्धा सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या खेळाडूंमध्ये आहेत. आर्श्चयाची गोष्ट आहे की कॉमेडियान कपिल शर्मा सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या टीव्ही सेलिब्रेटींमध्ये मोडतो. त्याने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २६ कोटी रुपये अॅडव्हान्स टॅक्स जमा केला आहे.