GBS : राज्यभरात जीबीएसची रूग्णसंख्या १५० पार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ फेब्रुवारी ।। राज्यभरात अनेक ठिकाणी गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या मेंदूविषयक आजाराने गेल्या काही दिवसांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे जीबीएसमधून बरे होत असलेल्या ३८ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या २८ वरून २१ पर्यंत घटली आहे.

जीबीएस आजाराच्या नवीन नऊ रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या १५८ वरती पोहोचली आहे. यापैकी ८३ रुग्ण महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. उर्वरित ३१ रुग्ण पुणे महापालिका, १८ पिंपरी चिंचवड महापालिका, १८ रुग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत. इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या आठ आहे. एकूण रुग्णांपैकी २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर ४८ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.

या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घरोघरी सर्वेक्षण करून आजपर्यंत पुणे पालिकेतील ४० हजार ८०२ घरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ११ हजार २०३ घरे आणि पुणे ग्रामीणमधील १२ हजार अशा एकूण ६४ हजार ५६७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांमधील १६० पाणी नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्यापैकी पाण्याचे आठ नमुने पिण्यास अयोग्य आहेत. (GBS)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *