निरंकारी संत समागम मैदानामध्ये मिशनच्या माध्यमातून विशाल वृक्षारोपण संपन्न…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ फेब्रुवारी ।। पृथ्वीवरील ग्लोबल वार्मिंगच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधिकाधिक वाढले आहे. २०२० पासून कोरोनाच्या संकटाने निसर्गाची अमूल्य देणगी, प्राणवायू अर्थात ऑक्सिजनचे महत्त्व समजून दिले आहे. त्याचबरोबर, या वायूच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम सुद्धा अधोरेखित झाले आहेत. मानवजातीचे जीवन प्राणवायू वर आधारित आहे, जो मुख्यत: वृक्षांमधून मिळतो. त्यामुळे वृक्षांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, तसेच आपल्या जीवनासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

सतगुरु माताजींनी समाजामध्ये एकात्मता कायम टिकवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि मानवतेची सेवा करणे हेही भक्तिचे अभिन्न अंग आहे आणि जीवनात भक्तीला सदैव प्राथमिकता द्यायला हवी असे उद्गार महाराष्ट्राच्या ५८ व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये विशाल जनसमुदायाला संबोधताना मांडले होते, त्या उक्तीतून प्रेरणा घेऊन रविवार, २ फेब्रुवारी २०२५ रोजी, पिंपरी येथील डेयरी फार्म, शास्त्रीनगर येथील संत निरंकारी समागम मैदानावर वृक्षारोपणाचा एक भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ५००० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे, पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी, पिंपरी क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवाणी, पुणे क्षेत्रीय संचालक अवनीत तावरे यांसह संत निरंकारी मंडळाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

संत निरंकारी मिशनने ऑगस्ट २०२१ मध्ये पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ‘वननेस वन’ या अभिनव प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पांतर्गत वृक्षरोपण तसेच वृक्षांची देखभाल करणे हाही उद्देश होता. पुणे परिसरातील खुटबाव, पाषाण, औंध आणि कोरेगाव मूळ याठिकाणी देखील अशाच प्रकारचे वृक्षारोपण केले गेले आहे. मिशनतर्फे यापुढे त्या सर्व वृक्षांची नियमित देखभाल देखील केली जात आहे.

संत निरंकारी मिशन पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अनेक कल्याणकारी उपक्रम राबवित आहे. यामध्ये वृक्षारोपण मोहीम, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, जलसंधारण प्रकल्प तसेच पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जनजागृती या उपक्रमांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *