महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० फेब्रुवारी ।। फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाईन डे, साखरपुडा, लग्नसमारंभाची सगळीकडे जय्यत तयारी सुरू असते. एकमेकांना भेटवस्तू देणे, जोडीदारासाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्यावर लोकांचा जोर असतो. सध्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या किंमतीत तेजी दिसत आहे. गेल्या महिन्याभरात सोन्याचा दर ८.६८ टक्क्यांनी वाढला आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचा दर जाणून घ्या.
आजचा सोने चांदीचा दर
आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,५२० रुपये तर चांदीचा दर ९५,८०० रुपये किलो आहे. बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७८,३९३ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ८५,५२० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९५८ रुपये आहे म्हणजेच चांदी ९५,८०० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७८,३०२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ८५,४२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७८,३०२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,४२० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७८,३०२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,४२० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७८,३०२ रुपये आहे. ४ कॅरेट सोन्याचा दर ८५,४२० रुपये इतका आहे.
वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.